पालघरमध्ये लक्झरी बसचा भीषण अपघात, ६ ठार ४५ जखमी

पालघर जिल्ह्यात मोखाडा-त्र्यंबक मार्गावर खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे.

Updated: Mar 24, 2019, 04:57 PM IST
पालघरमध्ये लक्झरी बसचा भीषण अपघात, ६ ठार ४५ जखमी title=

पालघर : पालघर जिल्ह्यात मोखाडा-त्र्यंबक मार्गावर खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. मोखाडा - त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगण घाटात खाजगी बस पंचवीस फुट दरीत कोसळली. या अपघातात ६ जण ठार तर ४५ जण जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेले सर्वजण गुजरातच्या सुरतमधले आहेत. हे सर्वजण त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जात असताना दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. जखमींना त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस दरीतून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर काही जखमी व्यक्तींना त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.