संपूर्ण देशी बनावटीचं डॉर्नीअर विमान, १९ आसनी विमानासाठी पुढाकार

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या हवाई उडान योजनेचा शुभारंभ झोकात झाला. 

Updated: Dec 24, 2017, 09:11 PM IST
संपूर्ण देशी बनावटीचं डॉर्नीअर विमान, १९ आसनी विमानासाठी पुढाकार title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या हवाई उडान योजनेचा शुभारंभ झोकात झाला. 

प्रमुख अडसर

प्रामुख्याने अडसर ठरतो आहे तो हवाई सेवा आणि कमी आसानी विमाने. ही समस्या सोडविण्यासाठी आता संरक्षणासाठी अविराव्त सेवेत असलेल्या खुद्द एच ए एल ने प्रवासी विमाने बनविण्यास सुरुवात केलीये.

हिटलरच्या काळातील विमान

विश्वयुद्धात हिटलर यांच्या देशातील विमानांनी गाजविलेला थरार म्हणजे डॉर्नीअर. ही विमानं कुठल्याही वातवरणात जुळवून घेतात आणि छोट्याश्या धावपट्टीवरही उतरू शकतात. काहीसं छोटं असलं तरी वेळेवर आपतकालीन परिस्थितीत ही विमानं विनासायास उपयोगी ठरतात. आतापर्यंत अत्यंत यशस्वी ठरलेली ही विमाने आता प्रादेशिक पातळीवर हवाई सेवा वाढवण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहेत. भारतीय प्रदेशात उड्डाणाची परवानागी मिळवत. एच ए एल आता एकोणीस आसनी विमानानं छोट्या जिल्ह्यांना हवाईसेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. 

किती आहे किंमत?

या विमानाची किंमत पन्नास कोटी रुपये आहे. यामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा एच ए एल देणार आहे. एकोणीस आसनी या विमानाची एअर डेक्कनच्या गोपीनाथ यांनी पाहणी केली. स्थानिक धनाढ्य तसंच पर्यटन व्यवसायासाठी अत्यंत उपयोगी असलेलं हे विमान जिल्ह्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावू शकतात. 
 
हे विमान नाशिक विमानतळावर पाहणी आणि विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक विमानं तयार केल्यानं ही विमानं येत्या काळात प्रवासी सेवेसाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास, एच ए एल नं व्यक्त केला आहे. आता गरज आहे ती देशी बनावटीच्या विमानांना प्रोत्साहन देण्याची.