विकास भोसले, झी मीडिया, महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या आंबटगोड आणि रसरशीत स्ट्रॉबेरीला जगभरातून प्रचंड मागणी असते आणि म्हणूनच याठिकाणी प्रचंड उत्पादन घेतलं जातं.
यंदाही २ हजार एकरावर १७ हजार ५०० टन इतकं विक्रमी उत्पन्न झालंय. त्याचबरोबर स्ट्रॉबेरीनं यंदा दराचा उच्चांकही गाठलाय. प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला जगभरातून मागणी असते. दरवर्षी याठिकाणी स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलही आयोजित केला जातो. इथं भेट देणारे पर्यटकही मोठ्या आवडीनं स्ट्रॉबेरीची खरेदी करतात. यंदा स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगलं झाल्यामुळे शेतक-यांना चांगला भाव मिळण्याची आशा आहे.