महादेवराव महाडीक, सतेज पाटील समर्थक एकमेकांना भिडले

वार्षिक सभेत राडा होणार हे जवळपास निश्चित होतं. सभेच्या सुरूवातीला सत्ताधारी नेत्यांनी सभा कशी अटोपता येईल याचं नियोजन केलं होतं. 

Updated: Sep 28, 2017, 02:51 PM IST
महादेवराव महाडीक, सतेज पाटील समर्थक एकमेकांना भिडले title=

कोल्हापूर : कोल्हापूरातील छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या वार्षिक सभेत मोठा गोंधळ झाला आहे. सत्ताधारी नेते माजी आमदार महादेवराव महाडीक आणि आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी एकमेकांना भिडले. त्यानंतर सभेच्या ठिकाणी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. 

आजच्या वार्षिक सभेत राडा होणार हे जवळपास निश्चित होतं. सभेच्या सुरूवातीला सत्ताधारी नेत्यांनी सभा कशी अटोपता येईल याचं नियोजन केलं होतं. 

विरोधक सुरूवातीपासून आक्रमक झालेले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सभेचं कामकाज काही वेळ सुरू ठेवून सभा आटोपती घेतली. त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळाला सुरूवात झाली. त्यानंतर सत्ताधारी नेते माजी आमदार महादेवराव महाडीक गटाचे आणि विरोधक सतेज पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी हमरीतुमरी होऊन सभेच्या ठिकाणी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.