महाराष्ट्रात ८११ नवे करोना रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.    

Updated: Apr 25, 2020, 10:41 PM IST
महाराष्ट्रात ८११ नवे करोना रुग्ण,  २२ जणांचा मृत्यू  title=

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.  आज राज्यात तब्बल ८११ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामधील २२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांपैकी मुंबईत १३, पुण्यात ४, पुणे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवडमध्ये १, मालेगावात १, धुळे शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. २२ रुग्णांच्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर सहा महिला होत्या. 

त्यामुळे आता आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या  ७ हजार ६२८ पोहोचली आहे. राज्यात आज ११९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १०७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज राज्यात १ लाख ८ हजार ९७२ नमुने पाठविण्यात आले. २४ एप्रिल पर्यंत राज्यात १ लाख २ हजार १८९ नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९४ हजार ४८५ जणांची चाचणी निगेटिव्ह आले आहेत तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले. 

मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा अधिक मोठा होत आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेन्मेंट झोन आहेत. कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट या दोन शहरांमध्ये आहेत. त्यामुळे येत्या ४ मे रोजी देशातील लॉकडाऊन उठला तरी मुंबई आणि पुण्यातील निर्बंध काही दिवस वाढवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.