Ashish Shelar on Amit Thackeray: माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. पाठिंब्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला आहे. दरम्यान अमित ठाकरे 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सध्याच्या स्थितीनुसार, माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. शिवसेनेकडून सदा सरवणकर, उद्धव ठाकरेंच्या पक्षाककडून महेश सावंत रिंगणात आहेत.
"मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांनाही विनंती आणि चर्चा करणार आहे. महायुतीत कोणताही मतभेद, दरार नाही. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीलाही आमचा विरोध नाही. पण असं का होऊ शकत नाही की, महायुती म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्याच घरातील, राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल, तर महायुती आपण सर्वांनी त्याला समर्थन देऊ. आपण सगळेजण त्यांना निवडून देऊ," असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
"राज ठाकरेंनी सर्वांशी संबंध जपले. उद्धव ठाकरेंना वाटत नसलं तरी आम्हाला वाटतं. अमितला समर्थन द्यावं अशी माझी भूमिका आहे. मी तिघांशी बोलेन, मतभेद असेल तर दूर केले जातील, महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी," असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचंही आशिष शेलार म्हणाले आहेत. "कुठलाही मतभेद नाही. निवडून कोण येईल हा मुद्दा आहे. उमेदवारांच्या संदर्भात आम्ही एकमेकांना मदत करू. काँग्रेस 90 पर्यंत आलं, सेनेसमोर झुकलं. आज भाजपची दुसरी यादी येईल," असं त्यांनी सांगितलं. आम्ही नवाब मलिक यांचं काम करणार नाही. देवेंद्र फडणवीस भूमिका मांडतील अशसं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.