मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?

मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे  निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 19, 2024, 07:36 PM IST
 मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे  'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?  title=

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.. ते आहेत अमित राज ठाकरे... राज ठाकरे यांचे पूत्र.. आणि महाराष्ट्र  नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष...  मुंबईतल्या माहीम, भांडुप, दिंडोशी,कलिना, चांदीवली किंवा मागाठणेमधून अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, आता या चर्चेत मोठा ट्विस्ट आला आहे. मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे  निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. मात्र आता विधानसभेसाठी मनसे स्वबळावर लढणार आहे.. विधानसभा निवडणुकीत 220 ते 240 जागा लढणार असल्याचा राज ठाकरे यांनी घोषित केला आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. मात्र याचवेळी अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी इच्छा नव्हे तर मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलीय. मात्र खरंच अमित ठाकरे विधानसभा निवडणूक ल़ढवणार का आणि लढले तर कुठून लढणार याबाबत चांगलीच चर्चा सुरु आहे. 

अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली आहे अशी ही माहिती  सुत्रांकडून मिळत आहे. यात  अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी चर्चा होत आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे कडून नितीन सरदेसाई यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी झाले होते. तर त्याचवेळी मुंबई महापालिकेतही मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मनसेचा चांगला प्राबल्य या ठिकाणी दिसून येत आहे.

मनसेचे काही मतदार या मतदारसंघात असल्यामुळे आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा निवासस्थानही याच मतदारसंघात असल्याने याचा फायदा होऊ शकतो असा कयास मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अमित ठाकरे यांनीही वेळ पडल्यास मीही निवडणूक रिंगणात उतरेल जर राज ठाकरे यांनी आदेश दिला तर असं म्हटल्यामुळे आता राज ठाकरे आपल्या पुत्राला निवडणुकीसाठी मैदानात उतरवतात का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.