Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कल्याण पूर्व मध्ये सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं वाद पेटला आहे. कल्याणमध्ये शिंदे गटाच्या 19 नगरसेवकांनी BJP विरोधात घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचार सुरु होण्याआधीच भाजपला मोठा झटका बसला आहे.
गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकऱणी सध्या तुरुंगात आहेत..त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वेतून उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुनच कल्याण पूर्वमध्ये महायुतीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.. कल्याण पूर्व मधून भाजपनं आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिलीये. आ. गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही खोटे आरोप केल्याचा दावा शिवसैनिकांनी केलाय. त्यामुळे सुलभा गायकवडांच्या उमेदवारीला विरोध करुन शिवसेनेच्या 19 नगरसेवकांनी भाजपचं काम न करण्याचा इशारा दिलाय. याबाबत शिवसैनिकांनी बैठक बोलावली असून लवकरच रणनिती ठरववण्यात येईल असं सांगीतलंय.
पोलीस ठाण्यातच आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराचे पडसाद अजूनही उमटतायत. गणपत गायकवाड यांनी ज्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. महेश गायकवाडांच्या भूमिकेमुळं महायुतीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्या उमेदवारीला थेट विरोध केलाय.. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढण्याचा इशारा महेश गायकवाडांनी दिला होता. गणपत गायकवाड गेले तीन टर्म कल्याण पूर्वेतून आमदार आहेत.. असं असलं तरी त्यांनी कोणतंही विकासाचं काम कल्याणमधील जनतेसाठी केलं नसल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला होता.
भाजपच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीये.. यामध्ये 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आलीये.. भाजपच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीये.. तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांच्या घरातही उमेदवारी देण्यात आलीये..यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांनाही संधी देण्यात आलीये..