महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार

Amit Thackeray :  मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.  मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.  

वनिता कांबळे | Updated: Oct 23, 2024, 03:39 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत मुंबईच्या माहिम मतदार संघात पहायला मिळणार आहे.  राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत. ते आहेत अमित राज ठाकरे. राज ठाकरे यांचे पूत्र.. आणि महाराष्ट्र  नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष. अमित ठाकरे  माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे यांच्याविरोधात  ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

मंगळवारी मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. महिम हा मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिले किल्ल्याजवळ असलेला मतदार संघ आहे. याच माहिम मतदार संघातून अमित ठाकरे  निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने देखील उमेदवारी दिली आहे.  दादर माहिममधून शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.  शिवसेना पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. अमित ठाकरेंना माहिममध्ये संघर्ष करावा लागेल पण ते निश्चित विजयी होतील, असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय.

कोण आहेत महेश सावंत?

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरील राडा प्रकरणात ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आले होते. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More