Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत 6 नवे चेहरे, पण चौघांचा समावेशच नाही; कोण आहेत हे उमेदवार?

NCP List of Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज पहिली यादी जाहीर केली असून, यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तीन जागांवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले उमेदवार दिलेले नाहीत.   

शिवराज यादव | Updated: Oct 23, 2024, 02:43 PM IST
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत 6 नवे चेहरे, पण चौघांचा समावेशच नाही; कोण आहेत हे उमेदवार? title=

NCP List of Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज पहिली यादी जाहीर केली असून, यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तीन जागांवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले उमेदवार दिलेले नाहीत. तसंच पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सस्पेन्स कायम आहे. हडपसर विधानसभेतून चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे वडगाव शेरीवरून सुनील टिंगरे ची धाकधूक वाढली

राष्ट्रवादीकडून 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये हिरामण खोसकर (पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते), सुलभा खोडके (पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते), राजकुमार बडोले (पूर्वाश्रमीचे भाजप नेते), नजीब मुल्ला, निर्मला विटेकर आणि  भरत गावित (माणिकराव गावित यांचे पुत्र, भाजप) यांचा समावेश आहे. 

मुंबईतील तीन जागांवर अजित पवार यांनी आपले उमेदवार दिले नाहीत. ज्यामध्ये अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व आणि मानखुर्द शिवाजीनगर यांचा समावेश आहे.

झिशान सिद्दीकी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगली होती. अजित पवारांची भव्य जनसन्मान यात्रा वांद्रे पूर्व या मतदारसंघात पार पडली होती आणि या यात्रेचे नियोजन सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आले होते. तसेच झिशान सिद्दिकी आणि अजित पवार हे एकच मंचावर उपस्थित होते, त्यावेळी पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अजून त्यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली नाही.

राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची संपूर्ण यादी - 

बारामती - अजित पवार
येवला - छगन भुजबळ
आंबेगाव -  दिलीप वळसे पाटील
कागल - हसन मुश्रीफ
परळी - धनंजय मुंडे
दिंडोरी - नरहरी झिरवाळ
अहेरी - धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन - आदिती तटकरे
अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
उदगीर - संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
माजलगाव - प्रकाश दादा सोळंके
वाई - मकरंद पाटील
सिन्नर - माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते
अहमदनगर शहर - संग्राम जगताप
इंदापूर - दत्तात्रय भरणे
अहमदपूर - बाबासाहेब पाटील
शहापूर - दौलत दरोडा
पिंपरी - अण्णा बनसोडे
कळवण - नितीन पवार
कोपरगाव - आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
बसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण - शेखर निकम
मावळ - सुनील शेळके
जुन्नर - अतुल बेनके
मोहोळ - यशवंत विठ्ठल माने
हडपसर - चेतन तुपे
देवळाली - सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतपुरी - हिरामण खोसकर
तुमसर - राजू कारेमोरे
पुसद इंद्रनील नाईक
अमरावती शहर - सुलभा खोडके
नवापूर - भरत गावित
पाथरी - निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा - कळवा - नजीब मुल्ला