नेतान्याहू यांच्या दौ-याने महाराष्ट्राला काय मिळणार?

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आज महाराष्ट्र दौ-यावर आहेत. हा दौरा केवळ औपचारिक न राहता, या दौ-याचा महाराष्ट्रालाही फायदा होणार आहे... नेमकं काय साध्य होणार यावर एक नजर टाकुयात...

Updated: Jan 18, 2018, 10:43 AM IST
नेतान्याहू यांच्या दौ-याने महाराष्ट्राला काय मिळणार? title=

मुंबई : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आज महाराष्ट्र दौ-यावर आहेत. हा दौरा केवळ औपचारिक न राहता, या दौ-याचा महाराष्ट्रालाही फायदा होणार आहे... नेमकं काय साध्य होणार यावर एक नजर टाकुयात...

कुठे होणार कार्यक्रम?

मुंबईतल्या विविध उद्योजकांसोबत चर्चेबरोबरच 26/11च्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना आदरांजली वाहण्याचा नेतान्याहू दामत्पाचा कार्यक्रम आहे. 26/11च्या हल्ल्या नरिमन हाऊसजवऴ असणाऱ्या छबाद हाऊसमध्ये इस्रायली नागरिकांचा बळी गेला. त्याच छबाद हाऊसमध्ये हल्ल्यात बळी गेलेल्यांचं स्मारक उभारण्यात आलंय. नेतान्याहूंच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. 

ताज हॉटेलमध्ये परिषद

त्याआधी मुंबईच्या प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये नेतान्याहू बड्या उद्योजकांच्या परिषदेला संबोधित करणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र सरकारसोबत विविध सिंचन प्रकल्प आणि संशोधन क्षेत्रात इस्रायलकडून दिल्या जाणा-या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याविषयीही मुंबई चर्चा होणार आहे.