अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?

Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: सर्वाधिक स्ट्राइक रेटच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी खालोखाल असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार मंत्रिमंडळात असणार हे निश्चित झालं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2024, 10:07 AM IST
अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट? title=
अजित पवारांनी स्वत: फोन केल्याची माहिती (प्रातिनिधिक फोटो)

Maharashtra Cabinet NCP Ajit Pawar Miniters Full List: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षावर भारी पडला आहे. अजित पवारांच्या पक्षाने लढवलेल्या 60 जागांपैकी 41 जागांवर विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महायुतीमधील तिसरा महत्त्वाचा पक्ष असलेला अजित पवारांचा पक्ष जागा जिंकण्याच्या स्ट्राइक रेटबाबतीत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. आता या मोठ्या यशामुळे अजित पवारांना सत्तेत सन्मानपूर्वक वाटा मिळणार असल्याचं निश्चित झालं असून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांचे कोणते आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार हे निश्चित झालं आहे.

अजित पवारांनी स्वत: केले फोन

16 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ स्थापन केलं जाणार आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. निवडूण आलेल्या आमदारांच्या संख्येप्रमाणे मंत्रिपदं भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटली जाणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य नेत्यांची यादी समोर आल्यानंतर भाजपाकडूनही आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर आता अजित पवारांनी स्वत: आपल्या काही आमदारांना शनिवारी रात्रीपासूनच फोन करण्यास सुरुवात केली. 

अजित पवारांच्या पक्षाकडून मंत्री होणारे आमदार खालीलप्रमाणे :

आदिती तटकरे - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या अदिती तटकरेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती.

बाबासाहेब पाटील - अजित पवांच्या पक्षाकडून पहिल्यांदाच संधी दिली जाणाऱ्या आमदारांमध्ये बाबासाहेब पाटलांचं नाव आहे.

नक्की वाचा >> मंत्रिपदाची शपथ घ्या! राणे, मुंडे, नाईक, महाजनांना BJP कडून फोन; यादीत 'या' महिला आमदाराचाही समावेश

दत्तमामा भरणे - अजित पवारांच्या पक्षाने दत्तमामा भरणे यांनाही आमदारकीची शपथ घेण्यासाठी कॉल केला असल्याची माहिती समोर आली आहे. 

हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज घेणार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्याकडून काल रात्री हसन मुश्रीफ यांना फोन आल्याची माहिती समोर येत आहे. हसन मुश्रीफ कोल्हापुरच्या कागलचे आमदार आहेत. ते नवव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

नरहरी झिरवाळ - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळांना मंत्रिपद मिळणार असल्याचं सूचित करण्यात आलं आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्याच्या सूचना त्यांना करण्यात आला आहे. कोणते मंत्रिपद याबाबत माहिती देण्यात आलेली नसल्याचं समोर आलं आहे.

भुजबळ आणि धनंजय मुंडे पहिल्या पाचमध्ये नाहीत

विशेष म्हणजे अजित पवारांच्या पक्षाच्या या पहिल्या पाच जणांमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेंचा समावेश नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे या दोघांवर काही वेगळी जबाबदारी देणार की त्यांचा पत्ता कट झाला आहे याबद्दलची चर्चा दबक्या आवाजात सुरु असल्याचे समजते.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी - 

1) आदिती तटकरे 

2) बाबासाहेब पाटील 

3) दत्तमामा भरणे 

4) हसन मुश्रीफ 

5) नरहरी झिरवाळ