Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध दिल्ली संघाची 'दबंगगिरी', मिळवला रोमहर्षक विजय

Dabang Delhi vs Haryana Steelers: दिल्ली दबंग संघाने आघाडी स्थानावरील हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध ४४-३७ असा विजय मिळवला आणि आपले आव्हान कायम राखले.

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 15, 2024, 10:09 AM IST
Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध दिल्ली संघाची 'दबंगगिरी', मिळवला रोमहर्षक विजय title=

Dabang Delhi vs Haryana Steelers in PKL: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सामन्याच्या सोळाव्या मिनिटाला सहा गुणांनी पिछाडीवर असलेल्या दिल्ली दबंग संघाने आघाडी स्थानावरील हरियाणा स्टीलर्स संघाविरुद्ध ४४-३७ असा विजय मिळवला आणि आपले आव्हान कायम राखले. पूर्वार्धात हरियाणा संघ २०-१८ असा आघाडीवर होता.‌

हरियाणा संघाला प्ले ऑफ मध्ये स्थान 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत हरियाणा संघाने यापूर्वीच प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवले असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने उर्वरित सामने केवळ औपचारिकता म्हणूनच बाकी आहेत. तरीही शक्यतो अपराजित्व राखण्याच्या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत. दिल्ली संघाविरुद्ध त्यांनी सुरुवातीपासूनच योग्य रणनीती आखूनच खेळ केला.‌ सामन्याच्या सोळाव्या मिनिटाला त्यांच्याकडे सहा गुणांची आघाडी होती. मात्र दिल्ली संघाच्या खेळाडूंनी संघर्षपूर्ण खेळ करीत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांनी यशही मिळाले.  पूर्वार्ध संपण्यापूर्वी एक मिनिट बाकी असताना दिल्ली संघाने हरियाणा संघावर लोण चढवीत सर्वांना चकितच केले. मध्यंतराला त्यांच्याकडे २०-१८ अशी आघाडी होती. 

हे ही वाचा: WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?

 

हे ही वाचा: IND vs PAK: आज होणार भारत-पाकिस्तान सामना! किती वाजता आणि कुठे बघता येणार मॅच? जाणून घ्या

उत्तरार्धात दिल्ली संघांची दबंगगिरी

उत्तरार्धात दिल्ली संघांची दबंगगिरी सुरुवातीपासून दिसून आली. तिसऱ्याच मिनिटाला त्यांनी आणखी एक लोण चढविला आणि २८-१९ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या सत्ताविसाव्या मिनिटाला त्यांनी ३०-१९ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. सहा मिनिटे बाकी असताना त्यांनी आणखी एक लोण नोंदवित आपली बाजू बळकट केली. त्यावेळी त्यांच्याकडे १३ गुणांची आघाडी होती.

 

हे ही वाचा: Champions Trophy: "ICC देतंय लॉलीपॉप...", PCB च्या 'या' निर्णयावर पाकिस्तानच्या बासित अली चिडला, बघा Video

 

दिल्ली संघाकडून आशु मलिक व नवीन कुमार यांनी जोरदार चढाया केल्या. आशु याने सुपर दहा गुणांची नोंदणी केली. आशिष याने सुरेख पकडी केल्या‌. हरियाणा संघाकडून शिवम पठारे व मोहम्मद रेझा यांनी खोलवर चढाया करीत अधिकाधिक गुण मिळविले.