WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?

Women's indian premier League:  इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांच्या नजरा महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागल्या आहेत. 

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 15, 2024, 09:47 AM IST
WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?  title=

WPL 2025 Auction Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांचे लक्ष महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागले आहे. आयपीएल मेगा लिलावात 639.15 कोटी रुपये खर्च झाले. आता  महिला प्रीमियर लीगच्या निमीत्ताने बीसीसीआयसमोर आणखी एक लिलाव यशस्वीपणे आयोजित करण्याचे आव्हान आहे. रविवारी बेंगळुरूमध्ये महिला प्रीमियर लीगच्या लिलाव आयोज करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 120 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी पाच फ्रँचायझी या लिलावात भाग घेणार आहेत. 

किती जागा आहेत रिक्त? 

लिलावात एकूण 91 भारतीय खेळाडू आणि 29 आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये असोसिएट नेशन्समधील तीन उदयोन्मुख पर्सनॅलिटीचा समावेश आहे. यापैकी 30 खेळाडू कॅप केलेले आहेत. 9 भारतीय आणि 21 परदेशी असे खेळाडूंना कॅप केले आहे तर  90 अनकॅप्ड (82 भारतीय, 8 परदेशी ) खेळाडू आहेत. बऱ्याच फ्रँचायझींनी त्यांचे मुख्य संघ कायम ठेवल्यामुळे, केवळ 19 स्लॉट खुले आहेत, ज्यात विदेशी खेळाडूंसाठी 5 आहेत.

हे ही वाचा: IND vs PAK: आज होणार भारत-पाकिस्तान सामना! किती वाजता आणि कुठे बघता येणार मॅच? जाणून घ्या

 

कोणत्या फ्रँचायझींसाठी किती पर्स उपलब्ध?

  • दिल्ली कॅपिटल्स - रु. 2.5 कोटी
  • गुजरात जायंट्स – ४.४ कोटी रुपये
  • मुंबई इंडियन्स - रु. 2.65 कोटी
  • यूपी वॉरियर्स – ३.९ कोटी रुपये
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ३.२५ कोटी रुपये

हे ही वाचा: Champions Trophy: "ICC देतंय लॉलीपॉप...", PCB च्या 'या' निर्णयावर पाकिस्तानच्या बासित अली चिडला, बघा Video

कधी होणार लिलाव? 

महिला प्रीमियर लीगचा लिलाव आज, रविवारी 15 डिसेंबर रोजी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलं आहे. 

लिलाव किती वाजता सुरू होईल?

खेळाडूंचा लिलाव दुपारी ३ वाजता सुरू होईल, तर प्रसारण ३० मिनिटे आधी सुरू होईल.

हे ही वाचा: नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच

 

तुम्ही महिला प्रीमियर लीगचा लिलाव कुठे पाहू शकाल?

तुम्ही JioCinema वर लिलाव लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. त्याच वेळी, ते स्पोर्ट्स 18 - 1 (SD आणि HD) वर दूरदर्शनवर प्रसारित केले जाईल.