सलाम मुंबई…महाराष्ट्र सावरतोय..पण अजूनही चिंता आहे मृत्यूदर वाढतोय याची...

मुंबई या कौतुकास पात्र आहे. कारण सोमवारीही मुंबईने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. कोरोनामुक्त देश होण्याची वेळ आता जवळ आली आहे.

Updated: May 11, 2021, 05:01 PM IST
सलाम मुंबई…महाराष्ट्र सावरतोय..पण अजूनही चिंता आहे मृत्यूदर वाढतोय याची...

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात सोमवारी केवळ 37 हजार 236 नवीन केसेस नोंदवले गेले आहेत. या आधी कोरोना संक्रमित नवीन केसेसची संख्या 60 हजार ते 65 हजार ओलांडत असत. परंतु गेल्या 6 -7 दिवसांपासून या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. ज्यामुळे दिवसातील नवीन केसेस 50 हजार ते 55 हजारांवर स्थिर होऊ लागली होती आणि त्यानंतर अचानक सोमवारची रुग्ण संख्या सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती.

कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर सोमवारी नवीन पॅाझिटिव्ह रुग्णांचा हा इतका कमी आकडा खरोखरच विक्रमी आकडा आहे. सुमारे दीड महिन्यांनंतर, महाराष्ट्रात इतके कमी केसेस समोर आले आहेत आणि कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या बाबतीत मुंबईने तर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

दुसरी एक महाराष्ट्रासाठी चांगली बातमी ही आहे की, आता मुंबई सारखेच महाराष्ट्रातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोना बाधीत होणाऱ्या नवीन रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे. सोमवारी नवीन पॉझिटिव्ह केसेसपेक्षा कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही खूपच जास्त होती. महाराष्ट्रात सोमवारी 61 हजार 607 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

शाबास मुंबई…

काही दिवसांपूर्वी कोरोना मॅनेजमेंटच्या 'मुंबई मॉडेल'चे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले होते. सोमवारी एनआयटीआय आयोगाने कोरोना नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या व्हिजन, मिशन आणि कृतीवरही विचार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबईकडून प्रेरणा घेऊन कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशाला दिशा मिळेल.

मुंबई या कौतुकास पात्र आहे. कारण सोमवारीही मुंबईने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. कोरोनामुक्त देश होण्याची वेळ आता जवळ आली आहे.

आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे की, मुंबई, पुणे आणि नागपूर ही तीन मोठी शहरे होती ज्यामधून अनेक कोरोनाबाधीत नवे रुग्ण समोर येत होते. तरीही त्यातून आता बरेच लोकं बरे झाले आहेत. अशाप्रकारे, एका दिवसात कोरोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या 3 हजार 580 झाली आहे. सोमवारी मुंबईत कोरोनामुळे 74 लोकांचा मृत्यू झाला. सध्या मुंबईत 6 लाख 78 हजार 269 पॉझिटिव्ह आणि 45 हजार 534 सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही 6 लाखांपेक्षा कमी झाली आहे. सध्या राज्यात सक्रीय रुग्ण संख्या 5 लाख 90 हजार 818 आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण संख्येत 51 लाख 38 हजार 973 इतकी वाढ झाली आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या वाढून 44 लाख 69 हजार 425 झाली आहे.

परंतु दुर्दैवाने, सोमवारी राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 541 आहे. अशाप्रकारे, कोरोनापासून राज्यात आतापर्यंत 76 हजार 398 लोकांचा बळी गेला आहे.