Maharashtra Exit Poll Results 2024: बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेना धक्का बसणार? तर कल्याणमध्ये...

Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल वर्तवला जात आहे. महाराष्ट्रात 48 जागांपैकी महायुतीचं 45+ जागा जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्य अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस असणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 1, 2024, 08:05 PM IST
Maharashtra Exit Poll Results 2024: बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेना धक्का बसणार? तर कल्याणमध्ये... title=

Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती निकालाची 4 जूनला. त्याआधी विविध संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले आहेत. यानुसार महाराष्ट्रात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Agahdi) जोरदार चुरस आहे. राज्यात महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता असून भाजपला सर्वात जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे. महाविकास आघाडीला 23 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला असून ठाकरे गट मोठा भाऊ असणार आहे. 

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंना धक्का बसणार
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार (Exit Poll) बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाण्यातून उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना पराभव पत्करावा लागण्याची शक्यत आहे. प्रत्यक्ष निकाल 4 जूनला लागणार आहे. 

ठाण्याचं राजकीय गणित 
शिवसेना ठाकरे गटानं यंदा तिसऱ्यांदा राजन विचारेंना मैदानात उतरवलंय. शिवसेनेत फूट पडली असल्यानं राजन विचारेंनी विजयासाठी पूर्ण जोर लावलाय. तर दुसरीकडं ठाणे म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड. याठिकाणी 
रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांची नवं चर्चेत होती. यापैकी नरेश म्हस्के तिकिट मिळवण्यात यशस्वी ठरले. पण एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार ठाण्या म्हस्के दुसऱ्या क्रमांकावर असणार आहेत. 

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे बाजी मारणार?
 कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं वर्चस्व आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना गटाकडून वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विजयी होणार असल्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलीय.