Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात 48 जागांवर नेमका काय निकाल असेल? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर राजकीय गुंतागुंत आणि भावनिक राजकारण यामुळे निकाल नेमका काय असेल याचे वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.   

Updated: Jun 1, 2024, 09:19 PM IST
Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात 48 जागांवर नेमका काय निकाल असेल? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर title=

Maharashtra Exit Poll: लोकसभा निवडणुकीत एकीकडे देशात नेमका काय निकाल लागेल याची उत्सुकता असताना महाराष्ट्रातील निकालही उत्कंठा वाढवणारा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीमधील फुटीनंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक राजकारण करण्यात आलं असून या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता आहे. देशात 400 च्य़ा पुढे जाण्याचा निर्धार कऱणारा भाजपा महाराष्ट्रात मित्रपक्षांसह जिंकणार की महाविकास आघाडी धक्का देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. यादरम्यान एक्झिट पोलचे निकाल समोर आले असून टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटने महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमकं काय चित्र असेल याचे अंदाज वर्तवले आहेत. हे अंदाज जाणून घ्या. 

मतदारसंघ आघाडी

पिछाडी

बीड पंकजा मुंडे    बजरंग सोनावणे 
अहमदनगर निलेश लंके सुजय विखे पाटील
कोल्हापूर  शाहू महाराज संजय मंडलिक
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर सुधीर मुनगंटीवार 
रत्नागिरी-सिंधुदूर्ग नारायण राणे विनायक राऊत
उत्तर मध्य मुंबई  वर्षा गायकवाड उज्वल निकम
अमरावती  नवनीत राणा बलवंत वानखेडे, दिनेश बूब
संभाजीनगर  चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे, इम्तियाज जलील
माढा  धैर्यशील मोहिते पाटील रणजीतसिंग निंबाळकर
जालना रावसाहेब दानवे मंगेश साबळे, कल्याण काळे
सोलापूर  प्रणिती शिंदे राम सातपुते
उत्तर पश्चिम मुंबई    अमोल किर्तीकर रवींद्र वायकर                  
सातारा शशिंकांत शिंदे उदयनराजे भोसले
नागपूर नितीन गडकरी विकास ठाकरे
बारामती सुप्रिया सुळे सूनेत्रा पवार
सांगली  विशाल पाटील चंद्रहार पाटील
परभणी संजय जाधव महादेव जानकर
ठाणे राजन विचारे नरेश म्हस्के
नांदेड प्रतापराव पाटील चिखलीकर वसंतराव चव्हाण
धाराशीव ओमराजे निंबाळकर अर्चना पाटील
नाशिक राजाभाऊ वझे हेमंत गोडसे, शांतिगिरी महाराज
दिंडोरी भास्कर भगरे भारती पवार
कल्याण  श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर
उत्तर  मुंबई पियूष गोयल शोभा बच्छाव
धुळे सुभाष भामरे शोभा बच्छाव
नंदूरबार हीना गावित गोवल पाडवी
जळगाव स्मिता वाघ करण पवार
रायगड अनंत गीते सुनील तटकरे
पुणे मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर
रावेर राकेश खडसे श्रीराम पाटील
भंडारा सुनील मेंढे प्रशांत पडोळे
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे अनिल देसाई
रामटेक राजू पारवे श्यामकुमार बर्वे
हिंगोली  नागेश आष्टीकर बाबुराव कदम कोहलीकर
हातकणंगले सत्यजीत पाटील धैर्यशील माने, राजू पाटील
मुंबई दक्षिण अरविंद सावंत यामिनी जाधव
पालघर हेमंत सावरा भारती कामडी

(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)