राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला! आणखी काही निर्बंध कडक, जाणून घ्या

राज्यातील कोरोना प्रतिबंधक निर्बंध आता 1 जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. 

Updated: May 13, 2021, 12:44 PM IST
राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला! आणखी काही निर्बंध कडक, जाणून घ्या

मुंबई  : राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध आता 1 जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. नविन निर्गमित केलेल्या आदेशांमध्ये आणखी काही नियमावली जारी करण्यात  आली आहे.

राज्यातील निर्बंध 31 मेपर्यंत कायम राहतील याबाबत संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

आज जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये आणखी काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोणत्याही मार्गाने येणाऱ्या व्यक्तींनी RTPCR निगेटीव्ह चाचणी दाखवणे बंधनकारक असणार आहे. रिपोर्ट 48 तासापेक्षा जास्त जूना नसावा

कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असेल. 

स्थानिक बाजारपेठा आणि बाजार समित्यांवर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवावं, जर एखाद्या ठिकाणी नियमांचं पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणं शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.