मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या लग्नात असं काय झालं की ज्याची होतेय सगळीकडेच चर्चा

या विवाहसोहळ्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे

Bollywood Life | Updated: Dec 7, 2021, 06:22 PM IST
मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या लग्नात असं काय झालं की ज्याची होतेय सगळीकडेच चर्चा

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या मुलीचा विवाहसोहळा (jitendra awhad daughter wedding) आज पार पडला. या विवाहसोहळ्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

मंत्री जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा हिचा विवाह एलन पटेलसोबत पार पडलं. आता राजकीय नेते म्हटलं की बँडबाजा, वरात,  प्राईम लोकेशन, आकर्षक सजावट करत लाखो रूपयांची उधळण हे आलंच. शिवाय मोठ-मोठ्या सेलिब्रेटिंची गर्दीही असतेच.

पण जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या सर्व प्रकार टाळत अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या मुलीचं लग्न लावत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. नताशा आणि एलन पटेल यांचं रजिस्टर पद्धतीने काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं.

आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात भावुक होत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एका बापाने अशावेळी काय बोलायचं? 'कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला, तरी ते होत नाही. याचे कारण म्हणजे घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार. यामुळं घरातील घरपण गेल्यासारखं असेल' अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

एलन पटेल हे स्पेनमधल्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला असून ते नताशाचे बालमित्र आहेत.