मुंबई हायकोर्टात सुरू होती 12 तासांपर्यंत सुरु होती सुनावणी, काय आहे कारण?

12 तास सुरु असलेल्या या सुनावणीत न्यायाधीशांनी ब्रेक न घेता बऱ्याच प्रकरणांवर सुनावणी केली. 

Updated: May 20, 2021, 09:08 PM IST
मुंबई हायकोर्टात सुरू होती 12 तासांपर्यंत सुरु होती सुनावणी, काय आहे कारण? title=

मुंबई : देशातील न्यायालयात लाखो केसेस पेन्डींग असल्याचे तर तुम्हाला माहितच असेल, त्यात काही अशा केसेस आहेत जे वर्षानोवर्षे सुरु आहेत किंवा त्यांना कोर्टाची तारीख अजून मिळेली नाही. याचे एक कारण सध्या समोर आले आहे, ते म्हाणजे न्यायाधीशांची कमतरता. देशात दिवसेंदिवस नवीन नवीन केसेसची नोंद वाढत आहे आणि न्यायाधीशांची कमी असल्याने बर्‍याचदा मोठ्या केसेस रात्री उशिरापर्यंत चालतात. त्यामुळे कोर्टालाही रात्री उशीरा पर्यंत काम करावे लागते. बुधवारी देखील असेच काहीसे झाले. महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 तासांपेक्षा जास्त वेळ सुनावणी सुरु होती.

12 तास सुरु असलेल्या या सुनावणीत न्यायाधीशांनी ब्रेक न घेता बऱ्याच प्रकरणांवर सुनावणी केली. बुधवारी न्यायमूर्ती एस.जे. काथावाला आणि न्यायमूर्ती एस.पी. तावडे हे सकाळी 10:45 वाजता कोर्टात पोहोचले आणि 12 तास न थांबता त्यांनी सुनावणी सुरु ठेवली.

यादरम्यान त्यांनी माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका आणि एल्गार परिषद प्रकरणातील मुख्य आरोपी स्टेन स्वामी यांच्य याचिकेसह एकूण 80 प्रमुख खटल्यांवर सुनावणी केली.

या आधी 16 तासांपर्यंत सुनावणी

न्यायाधीश काथावाला यांनी न थांबता सुनावणी केल्याची ही पहिली वेळ नव्हती. त्यांनी तीन वर्षांपूर्वी रात्री 3 वाजेपर्यंत सुनावणी केली होती. सुत्रांकडून असे सांगितले जात आहे की, त्यांनी यापूर्वी 16 तास कोर्टात बसून सुनावणी केली होती.

केवळ उच्च न्यायालयातच बराच काळ काम सुरु असते किंवा त्यांच्या वरतीच जास्त भार असतो असे नाही. यापूर्वी सुप्रीम कोर्टा ही रात्री उशिरापर्यंत काम करताना आपण पाहिले किंवा ऐकले असाल. बर्‍याच वेळा न्यायाधीशांना अशा परिस्थितींना सामोरे जावे लागते, त्यांना शक्य तितक्या लवकर एखाद्या विषयावर निर्णय घ्यावा लागतो आणि यामुळे त्यांना बराच काळ सुनावणीला बसावे लागते.