Police Recruitment : गड्यांनो, पोलीस व्हायचंय ना? अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख

Maharashtra Police Recruitment :  पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 11 लाख अर्ज आल्याची माहिती. एका जागेसाठी तब्बल 80 उमेदवारांमध्ये स्पर्धा. 

Updated: Dec 15, 2022, 10:44 AM IST
Police Recruitment : गड्यांनो, पोलीस व्हायचंय ना? अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख  title=

Maharashtra Police Recruitment : राज्यात काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police bharati) जाहीर करण्यात आली आहे. याचदरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज भरला नसेल तर आजच भरा. कारण आज (15 December) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने (Shinde and Fadnavis Govt) 18 हजारपेक्षा जास्त पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. भरती प्रक्रियेसाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती. पण ती वाढवून 15 डिसेंबर करण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटची संधी असेल. पोलीस भरतीमध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

शारीरिक चाचणी अशी असेल  

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची असणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. 

वाचा : एलन मस्क आता श्रीमंत माणूस राहिला नाही, कारण वाचून धक्का बसेल  

लेखी परीक्षा अशी असेल

पोलीस पदासाठी 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल. PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

ही कागदपत्रं आवश्यक

शाळा सोडल्याचा दाखला / 10 वी चे प्रमाणपत्र

जन्म दाखला

12 वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक

अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र

संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून)

समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र

आधारकार्ड (ऐच्छीक)

प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.

उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.

उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणावे

उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती तसेच, अलिकडील काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता आणावे.

मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.