विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : राज्याच्या राजकारणातून (Maharashtra Political Crisis) मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार आणि मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरु आहे. अखेर स्वत: खोतकरांनी एकनाथ शिंदे गटात जाणार की शिवसेनेतच राहणार, याबाबत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (maharashtra political crisis shiv sena ex minister and mla arjun khotkar reaction on eknath shinde group join or not)
जालना जिल्ह्यात वर्चस्व असलेले खोतकर फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. खोतकरांची नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेतेपदी नियुक्ती केली होती.
संभाजीनगर विमानतळावर अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांचा सोबत आगमन झालं. यावेळेस दोघांनी विक्टरी साईन केलं. यातून खोतकरांना एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचं सूचकरित्या सांगितल्य़ाची चर्चा रंगली आहे.
"माझा निर्णय मी जालन्यात जाऊनच स्पष्ट करेल. उद्या भूमिका मांडेल. शिंदे गटात जायचं की नाही ते उद्या ठरवणार. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय घेणार. तोपर्यंत वाट बघा", असं अर्जुन खोतकर म्हणाले.
तर जालना लोकसभा मध्ये माझा खारीचा वाटा आहे. आणि हा माझा खारीचा वाटा आता रावसाहेब दानवे सोबत नाहीतर अर्जुन खोतकर सोबत असेल असे अब्दुल सत्तार म्हणाले. ईडीचा याच्यासोबत काही संबंध नाही. आम्ही खोतकरांसोबत आहोत. खोतकर 31 तारखेच्या सिल्लोडच्या सभेत व्यासपीठावर दिसतील. एकनाथ शिंदे सोबत येतील असा मला विश्वास आहे, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.