Deepak Sawant to join Shinde: ठाकरे गटाला (Thackeray Faction) आणखी एक धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी शिंदे गटात (Shinde Faction) प्रवेश केला आहे. दीपक सावंत हे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दरम्यान त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला भगदाड पडण्याची शक्यता नाकारत येत नाही. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश करत असल्याची घोषणा करत मोठा धक्का दिला होता.
दीपक सावंत यांच्या निमित्ताने शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. दीपक सावंत हे शिंदे गटाचं मुख्यालय असणाऱ्या बाळासाहेब भवनमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. याच नाराजीमुळे उद्धव ठाकरे आणि दीपक सावंत यांच्यात अंतर निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. दरम्यान दीपक सावंत यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत असं सांगत त्यांनी आपल्या निर्णयाचं कारण सांगितलं. दरम्यान भूषण देसाईंच्या पक्षप्रवेशानंतर सर्वांना धक्का बसला होता. याचं कारण बंडखोरीदरम्यान सुभाष देसाई उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. यामुळे त्यांनी नंतर पत्रक काढत आपली बाजू मांडली.
Bhushan Desai | सुभाष देसाईंच्या मुलाच्या हातात शिंदेंचा झेंडा! देसाईच्या घरात पडली फूट
.
.
.#Shubhashdesai #CMshinde #Shivsena #maharashtra #politicalnews pic.twitter.com/zSUlNxCPol— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 13, 2023
“माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे,” असं सुभाष देसाईंनी पत्रकात म्हटलं आहे.