Maharashtra Politics : फडणवीस-ठाकरेंची पुन्हा दिलजमाई? महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार?

गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच 'आ' वासला. त्याचं झालं असं की, उद्धव ठाकरेंची गाडी आधी विधानभवनात आली.पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचले.

Updated: Mar 23, 2023, 08:51 PM IST
Maharashtra Politics : फडणवीस-ठाकरेंची पुन्हा दिलजमाई? महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार?

Maharashtra Politics : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु असून महाविकास आघाडीकडून शिंदे - फडणवीस (Shinde - Fadnavis Government) सरकारवर जोरदार टीका कऱण्यात येतेय. मात्र गुरुवारी दिसलेल्या एका फोटोमुळे सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत. यामुळे ठाकरे-फडणवीसांची पुन्हा दिलजमाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय

गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच 'आ' वासला. त्याचं झालं असं की, उद्धव ठाकरेंची गाडी आधी विधानभवनात आली.पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचले.

तेव्हा दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. यावेळी तर फडणवीसांनी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर दोघांनीही एकमेकांशी गप्पागोष्टी केल्या. हसत हसत संवाद करत विधानभवनाच्या पायऱ्याही चढले. त्यानंतर एकाच लिफ्टमधून ते सभागृहाकडे गेले. दोघांच्या या कृतीमुळे पुन्हा नवी युती होतेय की काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन अमित शाहांनी मातोश्रीवर बंद दाराआड दिलं होतं, असा उद्धव ठाकरेंचा दावा आहे. त्यावरून शिवसेना-भाजपचं बिनसलं आणि पुढचं राजकीय महाभारत घडलं. तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी मार्मिक टोलेबाजीही केली.

दोन दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून विधानसभेत फडणवीस आणि ज्युनिअर ठाकरे यांच्यात मिश्किल संवाद रंगला. आता तर उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातही हलकाफुलका का होईना, संवाद सुरू झालाय. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, याची आठवण या भेटीनं ताजी केली. मात्र मतदार जे घडलंय, ते कसं विसरेल, हे ही लक्षात ठेवायलाच हवं.