Maharashtra corona : महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना मृत्यू, नव्या कोरोनाग्रस्तांची संख्याही चिंताजनक

महाराष्ट्रात कोरोनाच्या (Maharashtra corona) वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आता वाढणारे मृत्यूचे (Maharashtra corona death) प्रमाणही चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना महामारीचा काळ सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा आज नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज तब्बल २२७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

Updated: Mar 31, 2021, 08:30 PM IST
Maharashtra corona : महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना मृत्यू, नव्या कोरोनाग्रस्तांची संख्याही चिंताजनक title=

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या (Maharashtra corona) वाढत्या रुग्णसंख्येसोबतच आता वाढणारे मृत्यूचे (Maharashtra corona death) प्रमाणही चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना महामारीचा काळ सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा आज नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज तब्बल २२७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

महाराष्ट्रातला कोरोनाचा मृत्यूदर सध्या दिसायला जरी १.९४ टक्के (Maharashtra corona death rate) असला, तरी गेल्या आठवड्याभरापासून राज्यात १००हून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे राज्यात आज ३९ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे हा ही आकडा धडकी भरवणारा आहे. 

याशिवाय २३ हजार ६०० रुग्ण आज कोरोनातून मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे महाराष्ट्रातले (Maharashtra corona recovery rate) प्रमाण ८५.३४ टक्क्यांवर गेले आहे. 

मुंबईतही आज ५ हजार ३९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर १५ लोकांनी आपला कोरोनामुले जीव गमावला आहे. तर इकडे नागपूर शहरातही १ हजार ८८४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

दरम्यान महाराष्ट्रातील ही वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लागेल की काय, अशीच भीती होती. मात्र झी २४ तासला मिळालेल्या माहितीनुसार राज्यात लॉकडाऊन नाही, तर निर्बंध कठोर होतील. ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक तर सुरू राहील, मात्र मॉल, सिनेमागृह यांसारखी गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येतील, अशी शक्यता आहे.