कोरोनाचा उद्रेक : राज्यात 63 हजार 294 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही.   

Updated: Apr 11, 2021, 09:31 PM IST
कोरोनाचा उद्रेक : राज्यात 63 हजार 294 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 349 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 हजार 8 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. झपाट्याने वाढत असलेली रूग्णसंख्या पाहाता राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. 

तर मुंबईत आज  9 हजार 989 नव्या कोरोना  रूग्णांची नोंद झाली आहे.  धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 58 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.  

कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 2 हजार 405 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 145 आहे. तर एका दिवसांत 890 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.