Maharashtra Weather : IMD च्या 'या' इशाऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका, पाहा तुमच्या भागात कसं असेल हवामान

Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावला आहे. तर, सर्वसामान्य नागरिकांमध्येही या पावसाची दहशत पाहायला मिळत आहे.   

Updated: Mar 23, 2023, 07:11 AM IST
Maharashtra Weather : IMD च्या 'या' इशाऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका, पाहा तुमच्या भागात कसं असेल हवामान
Maharashtra weather news Rain predictions in many parts of the country latest Marathi news

Maharashtra Weather : परीक्षांचा माहोल आता दूर जात असून, काही मंडळी वर्षभराच्या अभ्यासातून काहीशी मोकळीक मिळवताना दिसत आगेत. काही शाळांच्या परीक्षा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. पण, या साऱ्यांमध्ये सातत्यानं एकाच विषयावर चर्चा होत आहे, ती म्हणजे सुट्टीसाठी फिरायला जायचं कुठे? नोकरीधंदा सांभाळून आणि घरदार सांभाळून अनेक कुटुंबांमध्ये सध्या सुट्टीसाठीच्या गणितांची जुळवाजुळव सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही बेतही आखले जात आहेत पण, त्यावर अवकाळी पाऊस, ऋतू संपलेला असतानाही टीकून राहिलेली थंडी किंवा मग आग ओकणारा सूर्य विरजण टाकत आहे. थोडक्यात सध्याच्या हवामानाचा काहीच नेम नाही! (Maharashtra weather news Rain predictions in many parts of the country latest Marathi news)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात हवामान बदलत असल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्याच्या विदर्भ आणि कोकण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतपिकांबासून आंबा बागायतदारांपर्यंत सर्वांचच नुकसान झालं. महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस अशाच पद्धतीनं हवामानातील बदलांची नोंद केली जाईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. (Maharashtra Rain)

इतकंच नव्हे, तर अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांना आणि त्यांच्या आजुबाजूच्या परिसरांना Yellow Alert देण्यात आला आहे. त्याशिवाय ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, कोकण किनारपट्टी भागातही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून, काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार आहे. 

कमी दाबाचा पट्टा आणि अवकाळी पाऊस... 

स्कायमेटच्या अंदाजानुसार श्रीलंकेपासून पूर्वोत्तर मध्य प्रदेश, तामिळनाडूचा अंतर्गत भाग, तेलंगाणा, रायलसीमा आणि विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर, हरियाणानजीक चक्रीवादळसदृश्य परिस्थिती तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्येही हीच परिस्थिती. ज्यामुळं देशभरात सध्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : Raj Thackeray Warns Government: "एका महिन्याचा अल्टीमेटम देतोय..."; शिंदे-फडणवीसांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा थेट इशारा

 

दरम्यान, सध्या हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), अरुणाचल प्रदेश (Arunachal pradesh) भागातही मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि काही भागांमध्ये बर्फवृष्टी होताना दिसत आहे. ज्यामुळं ऐन पर्यटनासाठी पूरक असणाऱ्या दिवसांमध्येच या राज्यांमध्ये येणाऱ्या पर्यटकांची तारांबळ उडताना दिसत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात पुढील 2 दिवस पाऊस कायम असेल. तर (Jammu Kashmir) जम्मू काश्मीर, लडाख (Ladakh), सिक्कीम (Sikkim) या भागांमध्ये पावसासोबत बर्फवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.