देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात हलका पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या अगोदर गणपती विसर्जनानंतर पुन्हा एकदा पाऊस जोर पकडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मराठवाड्या क्षेत्रात पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. शनिवारी अनेक राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
20 Dept, उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या ३,४ तासात.
Pl watch for imd updates. pic.twitter.com/aJjaJX4c3G— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 20, 2024
हवामान खात्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलका, मध्यम अशा पावसाची शक्यता वर्तवली आहे. खासकरुन बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील 24 तास पाऊस कोसळणार आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर केला आहे. यलो अलर्ट सामान्यपणे पाऊस आणि सतर्क राहण्याच्या दृष्टीकोनातून जाहीर करण्यात येतो.
या वेळी मुंबईकरांना ऑक्टोबर हीटपासून दिलासा मिळू शकतो. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, जर ला निना सेट झाला तर ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू राहील. अशा परिस्थितीत यंदाही मान्सूनचे प्रस्थान लांबण्याची शक्यता आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये आतापर्यंत मुंबई शहरात 110.7 मिमी तर उपनगरात 170.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान मुसळधार सरी कोसळतील, परंतु अधूनमधून सूर्यप्रकाश राहील. 23 तारखेपासून पावसाचा जोर थोडा वाढणार आहे. दररोज 30 ते 40 मिमी पाऊस पडू शकतो, परंतु सध्या जोरदार पावसाची चिन्हे नाहीत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही पाऊस पडेल.
ला निना अद्याप सेट झाला नाही, परंतु ऑक्टोबरच्या सुरुवातीला मावळण्याची शक्यता आहे. असे झाले तर ऑक्टोबरमध्येही पाऊस पडेल आणि लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल. प्रादेशिक हवामानाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे कमाल तापमान 31.9 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रात्री आर्द्रतेची पातळी 87 टक्क्यांवर पोहोचली.