Balasaheb Thorat Resign: राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

Balasaheb Thorat Resignation : बाळासाहेब थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी मोठं विधान केलंय.

Updated: Feb 7, 2023, 05:26 PM IST
Balasaheb Thorat Resign: राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात... title=
Chandrashekhar Bawankule,Balasaheb Thorat

Congress Balasaheb Thorat Resignation : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून दाखवली होती. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. (Maharastra politics Will Balasaheb Thorat join BJP after resigning Chandrasekhar Bawankule made it clear latest marathi news)

सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी  सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्यासह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे. सत्यजीत तांबे यांनी भाजपमध्ये (BJP) येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव दिला नाही, असं स्पष्टीकरण देखील थोरात यांनी दिलंय.

काय म्हणाले Balasaheb Thorat?

भाजप हा राजकीय पक्ष आहे. त्यामुळं राजकीय पक्ष वाढवणं हे आमचं काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही... ज्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर त्यांचा मान सन्मान आम्ही ठेऊ, असं बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी उलटा सिक्का देखील फिरवला.

आणखी वाचा - 'शिवाजी महाराज गोट्या खेळवताना दाखवणार का' विधानावर आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले "औरंगजेबाला छोटं..."

बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस (Congress) आहे. त्यामुळं ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं मला वाटतंय, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी केलंय. त्यामुळे काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. बाळासाहेब थोरात यांच्या उंचीचा नेता जर माझ्यावर नाराज झाला असता तर मी नक्की यावर विचार केला असता, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिल्लीला पाठवलेले साधे पत्र आहे की राजीनामा आहे, हे अद्याप माहिती नाही, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी केलं होतं. त्यामुळे चर्चेला आता उधाण आलंय. त्याचबरोबर नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनाम्याच्या पत्राबद्दल माहिती नसल्याचं सांगितलंय. तर थोरातांनी राजीनामा (resign) देणं हे दुर्दैवी आहे. मी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करेन, असं अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटलंय. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये (Maharastra Congress) नेमकं काय चाललंय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.