Mumbai Job: एड्स नियंत्रण संस्थेत भरती, मुंबईत नोकरीसह मिळेल ५० हजारपर्यंत पगार

Mahasacs Job: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यालयाअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी लागणाऱ्या पात्रतेचा तपशील पुढे देण्यात आला आहे. या अंतर्गत उपसंचालक - काळजी, आधार व उपचार, उपसंचालक - स्ट्रॅटेजिक माहिती आणि सहायक संचालक-प्रतिबंध विभाग अशी ३ पदे भरली जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 13, 2023, 04:17 PM IST
Mumbai Job: एड्स नियंत्रण संस्थेत भरती, मुंबईत नोकरीसह मिळेल ५० हजारपर्यंत पगार  title=

Mahasacs Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल तर  तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. संस्थेत कंत्राटी पध्दतीने जागा भरल्या जाणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यालयाअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी लागणाऱ्या पात्रतेचा तपशील पुढे देण्यात आला आहे. या अंतर्गत उपसंचालक - काळजी, आधार व उपचार, उपसंचालक - स्ट्रॅटेजिक माहिती आणि सहायक संचालक-प्रतिबंध विभाग अशी ३ पदे भरली जाणार आहेत. 

केअर सपोर्ट अॅण्ड ट्रीटमेंट डिव्हीजन या विभागात डेप्युटी डायरेक्टरची एक जागा भरली जाईल. यासाठी उमेदवाराकडे मेडिकल सायन्सची डिग्री असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार ६८० रुपये इतका पगार दिला जाईल.

स्ट्रॅटेजिक इन्फॉर्मेशनमध्ये डेप्युटी डायरेक्टरचे एक पद भरले जाईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेडिकल सायन्सची पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार ६८० रुपये इतका पगार दिला जाईल. 

प्रिव्हेन्शन डिव्हिजन विभागात असिस्टंट डायरेक्टरचे एक पद भरले जाणार आहे. यासाठी उमेदवाराकडे सोशल सायन्सची पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची वेबसाइट  www.mahasacs.org वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज "प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अॅक्वर्थ कृष्ठरोग आवार, वडाळा उड्डाण पुलाजवळ, आर. ए. किडवाई रस्ता, वडाळा (प), मुंबई- ४००००३१" या पत्त्यावर पाठवायचा आहे. ऑफलाइन माध्यमातून आलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत. 

२६ जून २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विहीत नमुन्यात नसलेले तसेच मुदतीनंतर किंवा ई-मेलव्दारा प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्या.