मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. छगन भुजबळ हे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दिल्लीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Ajit pawar Reach to Varsha banglow to meet CM Uddhav Thackeray)
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्रीच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी अचानक बंडखोरी केल्याने शिवसेना आणि महाविकासआघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे सध्या सुरतमध्ये आहेत. त्यांच्यासोबत जवळपास 35 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर सुरतमध्ये आले होते. दोघांमध्ये चर्चा झालीये. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपुढे काही अटी ठेवल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना गटनेते या पदावरुन हटवण्यात आलं आहे.
दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे हे देखील सुरतमध्ये दाखल झाले आहेत.