जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाचं जंगी स्वागत

कारागृहातून नुकतीच सुटका झालेल्या चाळीसगावचा सराईत गुंड हैदर अली आसिफ अली सय्यद याचे मालेगाव शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. 

Updated: Feb 26, 2021, 12:47 PM IST
जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाचं जंगी स्वागत

नाशिक: पुण्यात कोयता घेऊन नाचणाऱ्या गुंडाला अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता मालेगावातील गुंडगिरीचा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर हा गुंडाचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

कारागृहातून नुकतीच सुटका झालेल्या चाळीसगावचा सराईत गुंड हैदर अली आसिफ अली सय्यद याचे मालेगाव शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या जल्लोषाचा उन्माद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा मात्र खडबडून जागी झाली. 

हैदरच्या स्वागतासाठी मालेगावातील गावगुंडही हजर होते. कारमधून हैदरनं मालेगावात मोठ्या दिमाखात आगमन केलं. गुंडांच्या जल्लोष मिरवणुका निघू लागल्याने शहर शांततेविषयी चिंता वाढू लागली आहे.

हैदरने चाळीसगाव फाटा भागातील एका फार्म हाऊसवर राहात असल्याची माहिती मिळाली आहे. या दरम्यान शहरातील बऱ्याच सराईत गुंडांनी त्याची भेट घेतल्याची चर्चा आहे. सराईत गुन्हेगाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अनेक सराईत गुन्हेगार दिसत आहेत. 

ह्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. सराईत गुन्हेगार हैदरविरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात तब्बल 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात आर्म अॅक्ट, गंभीर दुखापत, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी स्वरुपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याची गुन्हेभारी पार्श्वभूमी पहाता चाळीसगाव पोलिसांनी त्याचा हद्दपारी प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.