मुंबई : मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड २०१७ हा किताब पटकावला आणि भारताची मान उंचावली.
तिला हा किताब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला, असे विधान अद्याप भाजपकडून कसे आले नाही याचे आश्चर्य शिवसेनेला वाटत आहे. असे विधान शिवसेना मुखपत्र सामनातून विचारण्यात आले आहे. आजच्या अग्रलेखात उद्धव ठाकरेंनी हा टोला भाजपला लगावला आहे.
नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेली स्थिती चिंताजनक आहे. यावर सामनातून लक्षकेंद्रीत करण्यात आला आहे. कॅश संपली व चिल्लरवर गुजराण करावी लागत आहे. ब्रिटिश व्यापारी म्हणून आले व देशात ‘फोडा, झोडा व राज्य करा’ या पद्धतीने दीडशे वर्षे टिकले. व्यापाऱ्यांचे राज्य हे कधीच ईश्वरी वरदान नसते. त्यातून लूटच होत असते. आताची राजवट ज्यांना ईश्वरी वरदान वाटते त्यांनी ईश्वराचे अपमान करण्याचे थांबवावे. जनता म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वर भिकारी झाला आहे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
मानुषी विश्वसुंदरी झाली बरं का! हे श्रेय अद्यापि कुणीच कसे घेतले नाही याचेच आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटत आहे. मानुषीचे आडनाव ‘छिल्लर’ आहे म्हणून ती विजयी ठरली. हा मोदींच्याच नोटाबंदीचा विजय. कारण हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्यानेच ‘चिल्लर’चा (Chhillar) बहुमान झाला, असे सांगायला अद्यापि कुणीच कसे पुढे सरसावले नाही? खरे तर मानुषी छिल्लरने स्पर्धेत जी उत्तरे दिली त्यामुळे ‘ज्युरी’ खूश झाले व त्यांनी या हिंदुस्थानी सुंदरीस फक्त मुखडाच नाही तर तरल मेंदूसुद्धा आहे हे मान्य केले. ‘‘सर्वाधिक पगार कुणाला मिळायला हवा?’’ असा एक प्रश्न तिला विचारण्यात आला. ‘‘आईला सर्वाधिक मान मिळायला हवा. त्यांना कॅशमध्ये पगाराऐवजी खूप सन्मान आणि प्रेम द्यायला हवं’’ या उत्तराने ज्युरींची मने तिने जिंकली, पण मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली हे तिचे यश नसून नोटाबंदीचे यश आहे. नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेली स्थिती चिंताजनक आहेच. कॅश संपली व चिल्लरवर गुजराण करावी लागत आहे. ब्रिटिश व्यापारी म्हणून आले व देशात ‘फोडा, झोडा व राज्य करा’ या पद्धतीने दीडशे वर्षे टिकले. व्यापाऱ्यांचे राज्य हे कधीच ईश्वरी वरदान नसते. त्यातून लूटच होत असते. आताची राजवट ज्यांना ईश्वरी वरदान वाटते त्यांनी ईश्वराचे अपमान करण्याचे थांबवावे. जनता म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वर भिकारी झाला आहे!