'सकल मराठा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय'

मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय कोल्हापुरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. 

Updated: Sep 12, 2018, 11:43 PM IST
'सकल मराठा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय'

कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय कोल्हापुरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी एका राजकीय पक्षाची गरज असल्याच  एकमत या बैठकीत झालं. पक्ष स्थापनेपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्यात येईल. त्यानंतर  दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात येईल, असं या बैठकीत ठरलं.