मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाल्यानंतर आता सत्तेची गणितं समोर येण्यास सुरुवात होणार आहे. २८८ जागांसाठी लढवल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या मराठवाड्याकडून ४६ आमदार निवडले गेले. यामध्ये काही वादग्रस्त उमेदवारांपासून प्रतिष्ठित चेहऱ्यांची वर्णी पाहायला मिळाली.
मराठवाड्यामध्ये यंदा काही अंशी मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भावा- बहिणीच्या लढतीमध्ये म्हणजेच, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये बाजी मारली ती म्हणजे धनंजय मुंडे यांनी.
निवडणुकांचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला असतानाच या दोघांमध्येही गंभीर वादंग उठल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर परळीतील मतदारांनी पंजका मुंडे यांच्याऐवजी धनंजय मुंडे यांना विजय मिळवून दिला. असं असलं तरीही महायुतीला मराठवाड्यात चांगलं यश मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. तर, इथे 'शरद पवार फॅक्टर'चीही चांगलीच जादू झाली हे नाकारता येत नाही.
निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार
तिथे सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या संतोष दानवे यांनाही यंदाच्या निवडणुकीत यश मिळालं. तर, थेट कारागृहातून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांनीही गंगाखेडचा गड राखला. बंडखोर उमेदवार म्हणून त्यांनी यंदाची निवडणूक लढवली. सध्याच्या घडीला ४६ पैकी काही मतदार संघांचे निकाल हे अद्याप हाती आलेले नाहीत.
कारागृहातून निवडणूक लढवूनही 'ते' बंडखोर उमेदवार विजयी
आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी
मुखेड - तुषार राठोड (भाजप)
भोकर - अशोक चव्हाण (काँग्रेस)
वसमत - चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)
उदगीर - संजय बनसोडे (काँग्रेस)
लातूर शहर - अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)
लातूर ग्रामीण - धीरज विलासराव देसमुख (काँग्रेस)
बीड - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
औरंगाबाद पूर्व : अतुल सावे (भाजप)
पैठण- संदीपन भुमरे (शिवसेना)
गंगापूर - प्रशांत बंब (भाजप)
वैजापूर - रमेश बोरणारे (शिवसेना)
परळी - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
देगलूर- रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)
किनवट - भिमराव केराम (शिवसंग्राम महायुती)
नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर (शिवसेना)
नांदेड दक्षिण - मोहनराव हंबर्डे (काँग्रेस)
हदगाव - माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
लोहा - श्यामसुंदर शिंदे (शेकाप)
हिंगोली - तानाजी मुटकुळे (भाजप)
जिंतूर- मेघना बोर्डीकर (भाजप)
माजलगाव - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
केज - नमिता मुंदडा (भाजप)
आष्टी - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
परंडा - तानाजी सावंत (शिवसेना)
उस्मानाबाद - कैलास पाटील (शिवसेना)
उमरगा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
जालना - कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
नायगाव - राजेश पवार (रिपाई)
बदनापूर - नारायण कुचे (भाजप)
अहमदपूर - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
परतूर - बबनराव लोणीकर (भाजप)
उमरगा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
परभणी - राहुल पाटील (शिवसेना)
निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
कन्नड - उदय सिंग राजपूत (शिवसेना)
फुलंब्री - हरिभाऊ बागडे (भाजप)
गंगाखेड- रत्नाकर गुट्टे (रासप)
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाठ (शिवसेना)
औरंगाबाद मध्य - प्रदीप जैस्वाल (शिवसेना)
भोकरदन - संतोष दानवे (भाजप)
गेवराई - लक्ष्मण पवार (भाजप)
सिल्लोड - अब्दुल सत्तार (शिवसेना)
औसा - अभिमन्यू पवार (भाजप)
घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी)
कळमनुरी - संतोष बांगर (शिवसेना)