कौटुंबिक वादातून महिलेने पोलीस ठाण्यासमोरच स्वत:ला पेटवलं

अमनप्रीतने सासरी न जाता थेट मैत्रिणीचे घर गाठले.

Updated: Feb 10, 2020, 10:25 PM IST
कौटुंबिक वादातून महिलेने पोलीस ठाण्यासमोरच स्वत:ला पेटवलं title=

नाशिक: विवाहित मुलीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका ५५ वर्षीय महिलेने सोमवारी पंचवटी पोलीस ठाण्यासमोरच स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये महिला गंभीररित्या होरपळली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनप्रीत संधू (वय २७) हिचे गेल्याच महिन्यात छत्तीसगडमधील रायपूर येथील राजिंदर पाड्डा याच्याशी लग्न झाले होते. मात्र, इच्छेविरुद्ध लग्न लावून देण्यात आल्याने ती नाखूश होती. लग्नानंतर आठवडाभरातच पती शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याची तक्रार घेऊन अमनप्रीत माहेरी परतली होती. अमनप्रीतची आई हरप्रीत आणि वडिलांनी मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि तिला सासरी जाण्यास सांगितले. तेव्हा अमनप्रीतने सासरी न जाता थेट मैत्रिणीचे घर गाठले. यानंतरही घरच्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमनप्रीतने आपण सज्ञान असल्याचे सांगत स्वतंत्रपणे राहण्याची भूमिका घेतली. 

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई-वडील आणि भावाची आत्महत्या

घरच्यांनी सारखा तगादा लावल्यामुळे अमनप्रीतने पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमनप्रीतच्या पालकांना बोलावून मुलगी सज्ञान असून तिच्या इच्छेविरोधात काहीही करता येणार नाही, असे बजावले. हा वाद तिच्या आईला असह्य झाला. यातून आईने दिंडोरी रस्त्यावरील पंचवटी पोलीस ठाण्यासमोरच स्वतःला पेटवून घेतले.

हिंगणघाट जळीतकांडावर रेणुका शहाणेंची संतप्त प्रतिक्रिया

यात ती होरपळली असून प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. कौटुंबिक वादातून हरप्रीत यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी आत्महत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.