सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : इंटरनेट युगात तरुण पिढी पासून तर प्रौढ व्यक्ती सध्या सोशल मिडीयात (Social Media) रमला आहे. जीवनावश्यक ते आरोग्यविषयक सर्वच वस्तू सोशल मिडीयावर सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तू प्रयन्त सर्वच काही आपण सोशल मिडीयावर सर्च करत असतो. आणि याचाच फायदा सायबर चोरटे (Cyber Crime) घेऊ लागले आहेत. सोशल मिडीयावर बदली झाली असल्याने घरातील सामान विक्री करत असल्याची बतावणी करत फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. मात्र आता या सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट (Bogus Facebook Account) बनवत गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
अशी केली जाते फसवणूक
सायबर गुन्हेगारांनी जिल्हाधिकाऱ्यांचं बनावट फेसबूक अकाऊंट उघडलं. त्यानंतर दुचाकी आणि घरातील साहित्य कमी किंमतीत विकायचं असल्याचं सांगितलं गेलं. कोणी संपर्क साधल्यानंतर फोवर बोलणे केली जाते. आपली बदली फार लांब झाल्याने घरातील साहित्य आणि दुचाकी नेणे शक्य नसल्याने सर्व साहित्य तात्काळ विकायचं असल्याचे सांगितलं जातं. साहित्य बघायचे असल्यास काही रकमेची मागणी केली जाते तीही ऑनलाईन. ऑनलाईन पैसे मिळाल्यानंतर हा मोबाईल नंबर बंद केला जातो. आणि यानंतर कळते कि आपली फसवणूक झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचं बोगस खातं
सोशल मिडीयावर बनावट खाते ओपन करून फसवणुक केल्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे. जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाली होती. याचा फायदा सायबर भामट्यांनी घेतला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून घरगुती साहित्य विक्री करायचे आहे असे सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या संपर्कातील काहीना हे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत मित्तल यांना माहिती दिली. मित्तल यांनी याबाबत तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात सायबर चोराचा पोलीस शोध घेत आहेत.
फेसबु वर शेयर केली माहिती..
संशयित आरोपीने जिल्हाधिकारी यांच्या बनावट फेसबुकच्या खात्यावर घरगुती सामान विक्री असल्याच्या पोस्ट शेयर केल्या. सोबतच त्याचा पेटीएम क्रमांक सुध्दा टाकला होता. याच पेटीएम खात्यावर पैसे जमा करण्यासाठी स्वत:च्या बँक अकाऊंट नंबरसह संपुर्ण माहिती आणि पेटीएमचा क्युआर कोड सुध्दा फेसबुकवर शेयर करण्यात आला होता. फेसबुकवर शेयर केलेल्या माहितीच्या आधरे बनावट फेसबुक खात तयार करण्याऱ्याचे नाव गोवर्धन लाल साहू असं असल्याचे समोर आले आहे. अमन मित्तल यांनी ऑनलाईन पध्दतीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दिली आहे.