नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

Updated: Dec 18, 2019, 07:50 AM IST

नागपूर : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ते हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाला आहे. एका बाईकवरून दोघेजण हेल्मेट घालून होते. ज्यापद्धतीने धमक्या आल्या होत्या त्याप्रमाणे हे पटलावर होतं असेही ते म्हणाले. मी सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी 'झी २४ तास'ला दिली.

एका ठिकाणी जेवून आम्ही बाहेर पुन्हा यायला निघत होतो. गाडी मी स्वत: चालवत होतो. माझ्यासोबत माझे मित्र होते. मागच्या बाजून बाईकस्वार होते. पहिली गोळी माझ्या बाजुच्या काचेत आली, दुसरी मधल्या सीटवर आली आणि तिसरी गोळी मागून आली. गाडी आत घुसली, कंट्रोल गेला त्यामुळे आम्ही वाचलो असे महापौर जोशी म्हणाले. ६ आणि १२ तारखेला धमकी आली होती त्यामुळे संशय घ्यायला बराच वाव आहे.