मुंबई पुणे महामार्गावर आज मेगा ब्लॉक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Updated: May 22, 2019, 08:14 AM IST
मुंबई पुणे महामार्गावर आज मेगा ब्लॉक title=

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. मार्गदर्शक फलकांसाठी कमानी बसवण्याचे कामकाज करण्यात येणार असल्याने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे हे काम करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मार्गदर्शक फलकांसाठी कमानी बसवण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे करण्यात येणार आहे.

या कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक चार तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक करणारी वाहने अलिकडेच म्हणजे पाली पुलाजवळ थांबवण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील पर्यायी मार्ग म्हणुन खालापूर टोलनाका येथुन प्रवासी वाहने जूना पुणे मुंबई वर वळवण्यात येणार आहे. 

सर्व प्रवासी वाहनचालकांनी खालापूर टोलनाका ( सावरली फाटा ), चौकफाटा ( कर्जत ), दांड फाटा, आजिवली चौक, शेडुग फाटा येथुन परत एक्सप्रेस वे वरुन मुबईकडे अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा. सर्व वाहनचालक आणि प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन पनवेल महामार्ग वाहतूक शाखेचे विभागाचे निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी केलं आहे.