परभणीतून भाजपच्या मेघना यांची अखेर माघार, शिवसेनेचा रस्ता मोकळा

 परभणीच्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.  

Updated: Mar 22, 2019, 06:04 PM IST
परभणीतून भाजपच्या मेघना यांची अखेर माघार, शिवसेनेचा रस्ता मोकळा title=

मुंबई : परभणीच्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. परभणीची जागा शिवसेनेला गेली आहे. या जागेवर बोर्डीकर या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात भाजपातून बंडखोरी होऊ नये म्हणून शिवसेनेत अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे मराठवाड्याचे समन्वयक असलेल्या अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली. त्यानंतर बोर्डीकर यांची नाराजी दूर झाली. 

भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मेघना बोर्डीकर या नाराज होत्या. बोर्डीकर परभणी लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक असून गेल्या तीन वर्षांपासून त्या लोकसभेची तयारी करत होत्या. मात्र युतीच्या वाटाघाटीत परभणीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. इथून शिवसेनेचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत. युती झाली असताना मेघना बोर्डीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर थेट शिवसेनेला फटका बसला असता. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेत्यांनी बैठक घेतली. त्यावेळी बैठक निष्फळ ठरली. पुढील चर्चेसाठी २२ मार्चला मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईला बोलावले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढली.