वितळलेला धातू अंगावर पडून तिघांचा मृत्यू

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला... तर एक जण गंभीर जखमी झालाय. 

Updated: May 30, 2018, 07:55 PM IST
वितळलेला धातू अंगावर पडून तिघांचा मृत्यू  title=

पालघर : वितळलेला धातू अंगावर पडल्यानं तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पालघरमध्ये घडलीय. पालघर जिल्ह्यातील आंबिटघरच्या तोरणा एस्पा कंपनीत ही दुर्दैवी घटना घडलीय. उकळता धातू अंगावर पडल्यानं घटनास्थळी उपस्थित असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला... तर एक जण गंभीर जखमी झालाय. जखमी व्यक्तीला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.