पुणे : २०२१ च्या आधी मेट्रो मध्ये बसायला मिळेल, असं आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांना दिलं आहे. पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या दुसऱ्या टप्प्याच्या मेट्रो मार्गाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
मेट्रोच्या स्टेशन आणि शिवसृष्टीचं काम एकाच वेळी होईल, आणि याबाबत लवकरच तोडगा काढू असं ही त्यांची यावेळी स्पष्ट केलं. दुसरीकडे नागपुरात एका वर्षाच्या आत ५ किमी मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. मुंबईतही मेट्रोचे काही प्रकल्प सुरू आहेत.