किरकोळ वादातून तरुणाची गळा चिरून हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

 भुसावळमध्ये किरकोळ वादातून ३५ वर्षीय तरुणाची पेपर कटरने गळा चिरून हत्या.

Updated: Aug 31, 2019, 07:53 PM IST
किरकोळ वादातून तरुणाची गळा चिरून हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद title=

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळमध्ये किरकोळ वादातून ३५ वर्षीय तरुणाची पेपर कटरने गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्री दहानंतर हॉटेल खान्देशमध्ये ही घटना घडली हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही घटना चित्रित झाली असून भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे.

विकास साबळे असे मृत तरुणाचे नाव असून तो मध्य रेल्वेत गॅंगमन म्हणून कामाला होता. नीलेश ताकदे असे हत्या कारणाऱ्याचं नाव आहे. आपण वयाने मोठे असून देखील आपल्याला पिंटू म्हणाला म्हणून त्याचा राग आला आणि त्यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, नीलेशची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. रात्री दहानंतर हॉटेल खान्देशमध्ये ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही घटना चित्रित झाली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.