आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली, आज जामीन मिळणार का?

Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्या जामीनावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय निकाल देणार आहे. याचा निकाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे. 

Updated: Feb 9, 2022, 12:18 PM IST
आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली, आज जामीन मिळणार का? title=

कोल्हापूर : Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्या जामीनावर आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय निकाल देणार आहे. याचा निकाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नितेश राणे यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (MLA Nitesh Rane's health deteriorated)

नितेश राणे यांच्या जामिनावर कधीही निकाल हाती येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय जामीनावर निकाल देणार आहे. काल  निकालवर सुनावणी झाली होती. नितेश राणे यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, नितेश राणे यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. रात्री तीन वाजल्यापासून उलट्या होत असल्याने नितेश राणे हैरान झाले आहेत. नितेश राणे यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी  नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात सापडलेत. त्यांच्यावर या हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे त्यांचाच हात आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर कारमधून आलेल्या दोघांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.