...आणि बाळासाहेबांचा 'राजा' ढसाढसा रडला; राज ठाकरेंचा फोटो शेअर करत काका - पुतण्याच्या नात्यावर मनसेची भावनिक पोस्ट

Maharashtra politics : मनेसने राज ठाकरेंचा फोटो शेअर करत काका - पुतण्याच्या नात्यावर भावनिक पोस्ट X या सोशल मिडिया हँडलवर केली होती. यानंतर मनसेने काही वेळातच ही पोस्ट डिवीट केली. 

वनिता कांबळे | Updated: Feb 18, 2024, 10:22 PM IST
...आणि बाळासाहेबांचा 'राजा' ढसाढसा रडला;  राज ठाकरेंचा फोटो शेअर करत काका - पुतण्याच्या नात्यावर मनसेची भावनिक पोस्ट title=

MNS Raj Thackeray : महाराष्ट्राचं राजकारण सध्या  काका - पुतण्याच्या नात्याभोवती फिरतं आहे. सध्या चर्चेत आहेत ते पवार काका पुतणे. अजित पवार यांनी यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. या फुटीमुळे शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याच्या नात्यामध्ये देखील अंतर निर्माण झाले आहे. अजित पवार हे सातत्याने शरद पवार यांच्यावर निशाणा साधत आहेत. यासह आता  काका पुतण्याच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेते रितेश देशमुख भावुक झाला आहे. यानंतर आता काका - पुतण्याच्या नात्यावर मनसेने भावनिक पोस्ट केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारावेळीचा राज ठाकरे यांचा फोटो देखील मनसेने शेअर केला आहे. 

अशी आहे मनसेची पोस्ट?

आज महाराष्ट्रात राजकीय कुटुंबातील काका - पुतण्या या नात्यावर अनेक जण व्यक्त होत आहेत. कुणी आपल्या काकांचं वय काढतोय, उर्मट बोलतोय तर कुणी काकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गहिवरतो आहे... पण अशाच एका काका - पुतण्याचं निस्सीम प्रेम महाराष्ट्राने अनुभवलं आहे. ती दृश्य आजही महाराष्ट्राला स्तब्ध करतात. २०१२ साली बाळासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाणार होता आणि बराच काळ धीरगंभीर होऊन अंत्यसंस्कार पाहणाऱ्या श्री. राज ठाकरे ह्यांचा बांध फुटला... आणि बाळासाहेबांचा 'राजा' ढसाढसा रडला. आजही ते क्षण आठवले की, गहिवरुन येतं... हेच खरे मराठी संस्कार... अशी पोस्ट मनसेने सोशल मिडियावर शेअर केली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरेंचा फोटो देखील मनसेने शेअर केला आहे. 

काका पुतण्याच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेते रितेश देशमुख भावुक

लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात रविवारी विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला.. या कार्यक्रमात वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेते रितेश देशमुख भावुक झाले...भावा-भावाचं आणि काका-पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे, याचे ज्वलंत उदाहरण आज इथे तुमच्यासमोर आहे असं रितेश देशमुखांनी म्हणाले.. तर काका-पुतणे नात्यावरून जयंत पाटील आणि नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता त्यांना चिमटे काढले.

तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालोच असतो... अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा 

पक्ष चोरला काय म्हणता? मी जर वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालोच असतो अशा शब्दात अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय. तसंच माझा परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुबीय माझ्याविरोधात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. मात्र आपण संपूर्ण ताकदीनं लढणार असा निर्धारही त्यांनी बारामतीच्या मेळाव्यात व्यक्त केला.