Raj Thackeray: महाराजांनी सुरतेची लूट करून इथे आणली, हे लुटून सुरतला गेले; एकनाथ शिंदेच्या बंडखोरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray:  मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्रीपदाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या सभेतच आक्षेप का घेतला नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  

Updated: Mar 22, 2023, 09:10 PM IST
Raj Thackeray: महाराजांनी सुरतेची लूट करून इथे आणली, हे लुटून सुरतला गेले; एकनाथ शिंदेच्या बंडखोरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले? title=

Raj Thackeray Rally : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर (Shivtirtha) धडाडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात जबरदस्त शिवसेनेतील बंडखोरीबाबत भाष्य केले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड आणि सुरत तसेच गुवाहाटी दौऱ्यावर राज ठाकरे यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली.   

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदात मश्गुल होते.  आमदारांना भेटायला त्यांना वेळ नव्हता. 40 आमदार कंटाळून शिवसेना पक्ष सोडून गेले. मग 20 जून 2022 ला सुरत-गुवाहाटी-गोवा असा शिंदे गटाचा प्रवास झाला. महाराजांनी सुरतेची लूट करून इथे आणली. मात्र, हे लुटून सुरतेला गेले असे म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत भाष्य केले.   

शिवसेना आणि धनुष्यबाणाचा वाद पाहून वेदना झाल्या

शिवसेना आणि धनुष्यबाण... हे तुझ की माझ या वारुन वाद सुरु होता हा वाद पाहताना खूप वेदना झाल्या.  शिवसेना पक्ष, राजकारण लहानपनापासून पाहत आणि अनुभवत आलोया यामुळे हा वाद पाहचाना खूप वेदना झाल्या आहेत. 

मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य

अमित शाह ह्यांनी चार भिंतीत मुख्यमंत्री पदाबाबत आश्वासन दिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचं नाव पुढचे मुख्यमंत्री म्हणून घेत होते तेंव्हा आक्षेप का नाही घेतलात ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  आपल्याशिवाय सत्ता बसत नाही बघून मुख्यमंत्रीपदाची मागणी काढली असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

जनता यांच्या तोंडात  शेण घालेल

राजकारणाचा सगळा जो चिखल करून ठेवला आहे.  एकदा निवडणूका घ्या आणि जनतेला ठरवू द्या. ज्यांच्या तोंडात शेण घालायचं आहे त्यांच्या तोंडात जनता शेण घालेल, ज्याला सत्तेत बसवायचं त्याला बसवेल असं म्हणत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणाबाबत जाहीर भाष्य केले.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती

माझी एकनाथ शिंदेंना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या मागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी घेतली वरळीत सभा घेतली. खेडमध्ये सभा घेतली घेतली शिंदेनी खेडनमध्ये सभा. थांबवा हे असं राज ठाकरे म्हणाले.