औरंगाबाद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी मनसेने शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांती चौक मध्ये अडवली आणि शिवसेनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत चंद्रकांत खैरेंच्या अंगावर निषेधाची पत्रकं उधळली.
शिवसेनेने सरकार चालवण्यापुढं लाचारी पत्करली आहे आणि याच लाचारीमुळे शिवसेना औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू शकत नाहीये असा आरोप मनसेने केला.. दरम्यान आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा इशाराही मनसैनिकांनी दिलाय.
ती संघटना आहे की पक्ष आहे, मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे, असा खरमरीत टोला शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसेला (MNS) लगावला.
मनसेने शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतली जात आहे, असा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केला होता. फेरीवाले बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतात. बाळासाहेबांचे फोटो लावून हे कृत्य करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. यावर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देताना ही तर टाईमपास टोळी आहे, असे म्हटले आहे.