नागपूर : राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूरच्या मोनिका किरणापुरे हत्याकांड प्रकरणी नागपूर खंडपीठानं चौघाही आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवलीय. मारेकऱ्यांच्या निशाण्यावर दुसरीच तरुणी असताना, चुकीनं मोनिकाचा खून करण्यात आला.
नागपूरच्या जिल्हा न्यायालयानं ३ जून २०१५ ला या प्रकरणाचा सूत्रधार कुणाल अनिल जयस्वाल, त्याचा साथीदार प्रदीप महादेव सहारे, मोनिकावर प्रत्यक्ष हल्ला करणारे श्रीकांत सोनेकर आणि उमेश मराठे या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं खालच्या कोर्टानं दिलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवलीय. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती आरोपींच्या वकिलांनी दिलीय.