धावत्या लोकलमधून मायलेक नाल्यात पडले? कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान मायलेक नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 11, 2024, 11:33 PM IST
धावत्या लोकलमधून मायलेक नाल्यात पडले? कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यानची घटना title=

Kalyan Railway Station : धावत्या लोकलमधून मायलेक खाली पडल्याची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना घडली  आहे. रेल्वे पोलिसांमार्फत या दुर्घटनेबाबत अद्यात कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रेल्वेने प्रवास करत असताना कल्याण ठाकुर्ली स्थानका दरम्यान एक महिला आणि तिचा मुलगा धावत्या लोकलमधून पडल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका जखमींची पोलिस आणि अग्निशमन दलाने शोध घेतला आहे. मात्र, महिला बेशुद्ध असल्याने नक्की हा अपघात कसा घडला हे समजत नाही. 

कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे रुळा लगत असलेल्या नाल्यात हे दोघेजण पडले. मात्र, ते  लोकल मधून प्रवास करत होते की रुळाच्या बाजूने चालत होते. त्यावेळी हा अपघात घडला हे अधिकृतपणे पोलिसांना समजलेले नाही. त्यातील मुलाचा अग्निशमन दलाच्या जवानांनी एकाचा शोध घेतला असून महिला मात्र अजून सापडू शकलेली नाही. तिचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.