तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली

गेल्या महिन्याभरापासून आयुक्तांविरोधात विश्वासाच्या हालचाली सुरू होत्या.

Updated: Aug 27, 2018, 03:31 PM IST

नाशिक : नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सभागृह नेते दिनकर पाटील यांच्याकडून अधिकृत पत्र नगरसचिवांना देण्यात आलंय.

सर्व पक्ष एकवटले 

गेल्या महिन्याभरापासून आयुक्तांविरोधात विश्वासाच्या हालचाली सुरू होत्या. पण आज सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पुढाकार घेतला. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महापौरांनी गटनेत्यांची तातडीची बैठकही बोलावली आहे. सध्यातरी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्व पक्ष एकवटलेले दिसत आहेत.